पिंपरी (Pclive7.com):- रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंचाच्या वतीने श्री संत नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि.१४ ते शुक्रवार दि.२० या कालावधीत सोनिगरा मैदान रुपीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी दि.१४ ते २० रोजी पहाटे ४ वाजता काकडा, सकाळी ८ वाजता विष्णु सहस्त्र नाम, १० वाजता गाथा भजन, दुपारी १ वाजता भजन, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व रात्री ८ वाजता कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम असणार आहे
यावेळी शनिवार दि.१४ रोजी प्रवचनकार हभप. बाळकृष्ण महाराज बुरकुल नांदगाव, रविवार दि.१५ रोजी प्रवचनकार हभप. पंडित महाराज क्षिरसागर आळंदी, सोमवार दि.१६ रोजी प्रवचनकार हभप.प्रवीण महाराज लोळे आळंदी, मंगळवार दि.१७ रोजी प्रवचनकार हभप. ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा, बुधवार दि.१८ रोजी हभप. प्रवचनकार आक्रूर महाराज साखरे बीड, गुरुवार दि.१९ रोजी हभप. प्रवचनकार रामराव महाराज ढोक नागपूर, शुक्रवार दि.२० रोजी हभप. पविनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे बीड यांच्या प्रवचन व कीर्तनाच्या सेवेने तसेच शनिवार दि.२१ रोजी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान बीड येथील हभप. शिवाजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे, उपाध्यक्ष सतीश कंठाळे, औदुंबर पाडुळे, सोमनाथ मंडलिक, सर्जेराव कचरे, दीपक बोर्डे, उद्धव सरोदे, महादेव तांबे, अजय आजबे, विठ्ठल शिंदे, वनदेव खामकर, त्रिंबक मुळीक, पांडुरंग कदम व उत्सव कमिटीने सांगितले.






















Join Our Whatsapp Group