पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राचा विद्युत पुरवठा शुक्रवारी व शनिवारी खंडित झाल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे आज सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून संध्याकाळचा आणि उद्याचाही (रविवार) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्राचा काल शुक्रवारी आणि आज शनिवारी सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे त्या कालावधीत पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आज सकाळचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच आज संध्याकाळचा आणि उद्याचाही (रविवार)चा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group