पिंपरी (Pclive7.com):- रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ (डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस) साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्ञानज्योती सावितरीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थांनी शिक्षक बनून शाळेचा एक दिवशीय कारभार सांभाळला. नववीच्या विद्यार्थांनी गीत सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थांनी एकांकी सादर केली व एकांकिकेच्या माध्यमातून गुरुचे महत्त्व सांगितले. सातवीच्या विद्यार्थांनी नृत्य सादर केले. तसेच सहावीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या नकला सादर केल्या.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सूर्यभान तायडे, तात्या शिनगारे, जगताप बाबा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अरुण चाबुकस्वार सर यांनी या शिक्षक दिनाच्या शुभेच्या दिल्या व आज शिक्षक दिन ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं लढायला शिकवलं असा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. असेच माझ्या पाठीशी उभे रहा माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे असे आपल्या भाषेणातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दहावीच्या वैष्णवी गवळी या विद्यार्थिनीने केले व दानिश रजा या विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.